其他语言

Marathi (मराठी) – भारत टूलकिट

दरवर्षी सरासरी दोन ते तीन पत्रकार त्यांच्या कामामुळे मारले जातात, त्यामध्ये माध्यम व्यावसायिकांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक म्हणजे भारत होय. सरकारवर टीका करणारे पत्रकार नियमितपणे ऑनलाइन छळ, दहशत, धमक्या आणि शारीरिक हल्ले तसेच फौजदारी खटले आणि मनमानी अटकेला बळी पडतात. या संदर्भात, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) भारताला समर्पित एक सुरक्षा टूलबॉक्स प्रदान करत आहे. हे टूलबॉक्स सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटर (SFLC) आणि ग्लोबल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम नेटवर्क (GIJN) सारख्या आघाडीच्या भागीदारांनी विकसित केलेल्या व्यावहारिक, अद्ययावत संसाधनांना एकत्रित करते. थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनमधील सामग्री देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

या टूलबॉक्समध्ये शारीरिक आणि डिजिटल सुरक्षा, मानसिक आरोग्य, कायदेशीर हक्क आणि संरक्षण तसेच तपासासाठी साधने यावरील मार्गदर्शकांचा समावेश आहे. या टूलबॉक्सचे उद्दिष्ट भारतातील पत्रकार आणि माध्यम व्यावसायिकांना तसेच भारताला कव्हर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांना माध्यम स्वातंत्र्याविरुद्धच्या वाढत्या धोक्यांपासून स्वतःचे उत्तम संरक्षण करण्यास, स्वतःचे हक्क समजून घेण्यास आणि काम सुरू ठेवण्यास मदत करण्यासाठी मौल्यवान संसाधने प्रदान करणे आहे.

💡 भाषा :

संसाधने – भारत

सामान्य

इंग्रजी, हिंदी आणि बंगाली

पत्रकार सुरक्षा मूल्यांकन साधन (JSAT) – GIJN. सुरक्षा मजबूत करण्यासाठी शिफारसींसह, मीडिया संस्थेच्या भौतिक आणि सायबरसुरक्षा लवचिकतेचे ऑनलाइन मूल्यांकन प्रदान करते (इंग्रजी आणि हिंदी).

आचारसंहिता — दक्षिण आशियातील पत्रकारांच्या संघर्षप्रदान व संवेदनशील वार्तांकन आणि सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी — पब्लिक मीडिया अलायन्स. (इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि नेपाळी).

संसाधन केंद्र – MRDI. पत्रकारिता, नीतिमत्ता, सुरक्षा आणि पडताळणीवरील हँडबुक. बांगलादेशावर लक्ष केंद्रित केले असले तरी, भारतातील बंगाली भाषिक पत्रकारांसाठी (बंगाली) अनेक संसाधने उपयुक्त आहेत.

फक्त इंग्रजी

बीबीसी मीडिया अॅक्शन – इंडिया – संपूर्ण भारतात स्वतंत्र पत्रकारिता आणि जनहित वृत्तांकन मजबूत करण्यासाठी, मीडिया विकास आणि क्षमता-निर्मिती कार्यक्रम प्रदान करते. (इंग्रजी).

फ्री स्पीच कलेक्टिव्ह – जागतिक स्तरावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित संसाधने आणि साहित्य (इंग्रजी)

एनडब्ल्यूएमआय – भारतातील महिला पत्रकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा टूलबॉक्स (इंग्रजी)

भारतात उर्दू भाषेतील माध्यमांच्या संघर्षांमधून शाश्वतता निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नलिस्ट्स नेटवर्क (इंग्रजी)

डिजिटल सुरक्षा

इंग्रजी, हिंदी, बंगाली, मल्याळम, मराठी, तमिळ

इंटरनेट शटडाउन ट्रॅकर – SFLC. संपूर्ण भारतातील इंटरनेट निर्बंधांवर लक्ष ठेवते (इंग्रजी आणि हिंदी).

जगण्यासाठी मार्गदर्शक – SFLC. ऑनलाइन लिंग-आधारित हिंसाचारापासून तुमच्या ऑनलाइन जगाचे रक्षण कसे करावे. (इंग्रजी, मल्याळम, मराठी, तमिळ).

मार्गदर्शक: इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा शोध आणि जप्ती – SFLC. (इंग्रजी, हिंदी आणि मराठी).

फक्त इंग्रजी

फ्री स्पीच ट्रॅकर – एसएफएलसी (SLFC). भारतातील ऑनलाइन भाषण निर्बंधांवर लक्ष ठेवते. (इंग्रजी).

मेसेजिंग अॅप्लिकेशन्सचे सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्यांचे विश्लेषण (अराटाई, व्हॉट्सअॅप, सिग्नल, प्राव्ह, एलिमेंट) – एसएफएलसी. (इंग्रजी).

धोका आणि छळाखाली सुरक्षितपणे तक्रार करणे – JiG. (इंग्रजी)

शारीरिक सुरक्षा

इंग्रजी, हिंदी आणि बंगाली

पत्रकार सुरक्षा मूल्यांकन साधन (JSAT) – GIJN सल्लागार सेवांद्वारे हिंदीमध्ये उपलब्ध – पत्रकारांना त्यांच्या भौतिक आणि डिजिटल सुरक्षा पद्धतींचे मूल्यांकन करण्यास मदत करते. (इंग्रजी आणि हिंदी).

आपत्कालीन संच – फ्रंट लाइन डिफेंडर्स – पत्रकारांना नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार किंवा दीर्घकालीन ताण (बंगाली) यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी व तात्काळ वापरण्यासाठी सोप्या मूलभूत पद्धतींचा संच.

फक्त इंग्रजी

नागरी अशांततेचे वृत्तांकन करताना सुरक्षित राहण्यासाठी तंत्रे (हीट ट्रेनिंग) – आरएसएफ रिसोर्सेस वेबसाइट. (इंग्रजी).

निदर्शने कव्हर करणाऱ्या पत्रकारांसाठी सुरक्षितता सल्ले – आरएसएफ रिसोर्सेस वेबसाइट. (इंग्रजी).

नागरी अशांततेचे वृत्तांकन करतानाची तयारी – आरएसएफ रिसोर्सेस वेबसाइट. (इंग्रजी).

अर्थ जर्नलिझम नेटवर्क – दक्षिण आशियातील पर्यावरण पत्रकारांच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी (इंग्रजी).

मानसिक आरोग्य

फक्त इंग्रजी

डार्ट सेंटर फॉर जर्नलिझम अँड ट्रॉमा – आशिया पॅसिफिकमधील वृत्त माध्यम कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वृत्तकक्षांना आघात-माहितीपूर्ण प्रशिक्षण, सल्ला आणि समर्थन प्रदान करते. (इंग्रजी).

पत्रकारांसाठी स्व-काळजी – आरएसएफ रिसोर्सेस वेबसाइट. (इंग्रजी).

ऑनलाइन कलंकाचा सामना करताना काय करावे – आरएसएफ रिसोर्सेस वेबसाइट. (इंग्रजी).

टोटेम प्रोजेक्ट – पत्रकार आणि मानवाधिकार रक्षकांसाठी डिजिटल सुरक्षा, ऑनलाइन संरक्षण, मानसिक आरोग्य आणि जोखीम जागरूकता यावर मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम प्रदान करते. (इंग्रजी).

कायदेशीर सल्ला

इंग्रजी आणि हिंदी

तुमचे हक्क जाणून घ्या: भारतातील पत्रकारांसाठी मार्गदर्शक – ट्रस्ट लॉ (थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन) आणि सीपीजे. (इंग्रजी आणि हिंदी).

पत्रकार कायदेशीर अडचणी आणि खटले कसे टाळू शकतात – जीआयजेएन. (इंग्रजी आणि हिंदी).

फक्त इंग्रजी

भारतातील डिजिटल बचावकर्त्यांची संपर्क यादी, प्रदेशानुसार – SFLC. (इंग्रजी).

स्ट्रॅटेजिक लिटिगेशन – सोशल-लीगल इन्फॉर्मेशन सेंटर (SLIC) – कायदेशीर समर्थन प्रदान करते आणि माध्यमस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी धोरणात्मक खटल्यांचे नेतृत्व करते. (इंग्रजी).

भारतातील मानहानी कायदे समजून घेणे – थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन. (इंग्रजी).

डिजिटल पत्रकार डिफेनस क्लिनिक – भारतीय पत्रकारांना नि:शुल्क कायदेशीर सल्ला, मदत आणि प्रतिनिधित्व प्रदान करते. (इंग्रजी)

OSINT

इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि कन्नड

हिंदी हब – GIJN. हिंदीमध्ये तपास पत्रकारिता संसाधने प्रदान करणारी वेबसाइटची प्रादेशिक आवृत्ती. पर्यावरणीय किंवा सामाजिक समस्यांबद्दल पत्रकारांसाठी विविध संसाधनांसह जमीन वाद किंवा जातींवर तपास कथा लिहिण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे यासारख्या विशिष्ट मार्गदर्शकांचा समावेश आहे. (हिंदी).

OCCRP Aleph – OCCRP. लाखो सार्वजनिक आणि उघडकीस आलेल्या नोंदी (हिंदी, उर्दू आणि कन्नड) शोधून आणि त्या लिंक करून पत्रकारांना गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास मदत करणारा मोफत डेटा प्लॅटफॉर्म.

COVID-19 लसींबद्दल माहिती देणाऱ्या पत्रकारांसाठी वेबिनार – नाईट सेंटर द्वारे पत्रकारिता अभ्यासक्रम हिंदीमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध. साथीचे रोग आणि लसीकरण कव्हर करणाऱ्या पत्रकारांसाठी.

फक्त इंग्रजी

भारताशी संबंधित फ्रीलान्स तपासांचे आवाहन – बेलिंगकॅट भारतातील मुक्त स्त्रोत तपास अहवालांसाठी प्रस्ताव विचारात घेत आहे. यामध्ये मानवी हक्कांचे प्रश्न, अतिरेकीपणा आणि पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित कथांचा समावेश आहे, परंतु त्यापुरते मर्यादित नाही.

RSF सुरक्षा मार्गदर्शकाची लिंक
बाह्य संसाधनांची लिंक